Click Here...👇👇👇

पोंभुर्णा तालुक्यातील सावी महेंद्र वनकर हिची नवोदय विद्यालयात निवड.

Bhairav Diwase
महेंद्र वनकर सामाजिक कार्यकर्ते, जनता विद्यालय कर्मचारी आणि सौ. श्र्वेता म. वनकर नगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा यांची मुलगी.
Bhairav Diwase.   June 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- प्रत्येकाने आपले ध्येय गाठायचे ठरवून दृढ निश्चय करून प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळतो. असाच निश्चय करून महेंद्र वनकर सामाजिक कार्यकर्ते, जनता विद्यालय कर्मचारी आणि सौ. श्र्वेता म. वनकर नगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा यांची मुलगी.
        जनता विद्यालय पोंभुर्ण येथे ईयत्ता ६ वी मध्ये शिकत आहे. सावी ही लहानपणापासून हुशार मुलगी होती. सावी महेंद्र वनकर  हिची नवोदय विद्यालय तळोधी (बाळापुर) येथे निवड झाली आहे. तिचा ठरविलेला ध्येय व नित्य अभ्यासक्रम हाच तिला आज यशापर्यंत पोहचली.
       तिच्या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष अशोकभाऊ जिवतोडे, मुख्याध्यापक पिंपळकर, पर्यवेक्षक अमरसिंग बघेल, तसेच पोंभुर्णा तालुक्यातील मित्रमंडळ, परीवार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. साविने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक पिपंळकर, सर्व शिक्षकवृंद आणि आई वडील यांना दिले आहे. सावी ने दाखवून दिले की, ध्येय ठरवून प्रयत्न केले की यश नक्की मिळते.