Click Here...👇👇👇

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

Bhairav Diwase
गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपूर,वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
Bhairav Diwase.    June 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपुर:- महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख 6 जून रोजी सकाळी 9:30  वाजता श्रद्धा निवासस्थान, नागपुर येथुन जाम, वरोरा मार्गे चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहे. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन होऊन अभ्यांगताकरिता राखीव असणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दुपारी 12:30 वाजता कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या समवेत घेणार आहेत.

दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
दुपारी 3:30 वाजता चंद्रपूर वरून जाम, हिंगणघाट मार्गे वर्धाकडे प्रयाण करणार आहेत. सायंकाळी 5:30 वाजता शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे आगमन व अभ्यांगताकरिता राखीव असणार आहे.
सायंकाळी 6:30 वाजता कोरोना विषाणूच्या संसर्गाच्याअनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे घेणार आहे.

सायंकाळी 7:30 वाजता जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. रात्री 8 वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील व रात्री 10 वाजता श्रद्धा निवासस्थान, नागपूर येथे आगमन व मुक्काम असणार आहे.