मान्यवरांनी केले स्वर्गरथाचे लोकार्पण.
Bhairav Diwase. June 06, 2020
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत कोंडय्या महाराज देवस्थान धाबा यात्रेतील महापूजाकरीता सुधीरभााऊ मुनगंटीवार कार्यक्रमात आले होते, श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे स्वर्गरथाची मागणी केली होती त्या मागणीला सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच आपणास स्वर्गरथ उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला होता.
“दिला शब्द केला पूर्ण ” ह्या वचनाला जागणारा नेता म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज दिनांक ५ जून २०२० ला आपल्या आईच्या श्रीमती चांगुनाताई मुनगंटीवार ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज कोंडय्या महाराज देवस्थानाला स्वर्गरथ उपलब्ध करून दिला, स्वर्गरथाच्या लोकार्पण सोहळ्याला संध्याताई गुरनुले अध्यक्ष जिल्ह्या परिषद चंद्रपूर, माजी आमदार संजय धोटे, देवराव भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, माजी आमदार सुदर्शन निमकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून लोकार्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली सर्वांनी माजी अर्थमंत्री सुधीरभााऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले.
यावेळी वैष्णवी बोडलावार जिल्हा परिषद सदस्य, सुनीता येग्गेवार सभापती पंचायत समिती गोंडपीपरी, अमर बोडलावार अध्यक्ष श्री संत कोंडय्या महाराज देवस्थान धाबा, रोशनीताई अनमूलवार सरपंच ग्राम पंचायत धाबा, उल्हास करपे, किशोर अगस्ती, निलेश संगमवार, बबन निकोडे, अरुण कोडापे, निलेश पुलगमकर, संजय झाडे, साईनाथ मास्टे त्याच प्रमाणे धाबा येथील नागरिक उपस्थित होते.