अवैध रेती तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करा- श्री बालाजी बावणे राष्ट्रीय विधी सेवा स्वयंसेवक कल्याण समिती यांची मागणी.

Bhairav Diwase
रात्री बेरात्री रेतीची तस्करी होत असून गावकऱ्यांना सुद्धा नाहक त्रास.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील होत असलेल्या अवैध रेती तस्करी वर आळा घालून त्यांचेवर कार्यवाही करा असे निवेदन श्री बालाजी बावणे अध्यक्ष राष्ट्रीय विधी सेवा स्वयंसेवक कल्याण समिती यांनी मा तहसीलदार यांच्या मार्फतीने चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे. 
   सावली तालुका हे वैनगंगा नदीच्या काठावर वसले असून वैनगंगा नदी ही सावली तालुक्याला वरदान आहे. या नदीवर निर्माण केलेल्या सिंचन व्यवस्थेने या तालुक्यातील शेतकरी बऱ्याच प्रमाणात सुखावला आहे आणि या नदीमुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होत आहे. या वैनगंगा नदीमुळे वाळूचा प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे शासनाचा महसूल वाढवण्यात भरपूर प्रमाणात मदत होते. परंतु या कडे सावली तालुक्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या नदीच्या काठावर वसलेले साखरी, सामदा, व इतर घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असून कर्तव्यदक्ष अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. या ठिकाणातून रात्री बेरात्री रेतीची तस्करी होत असून गावकऱ्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध रेतीची वाहतूक करताना गाड्यांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. 
     सध्यस्थितीत घाटांचे लिलाव झाले नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी होत असताना यांच्या मागे कुणाचा हाथ आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे. एकीकडे शासनाने गरीब मजूर वर्गाला घरकुल योजना दिली असता घाटाचे लिलाव बंद असल्यामुळे रेती मिळत नाही. मग ही रेती तस्करी करणारे कुणाच्या आशिर्वादाने रेतीची तस्करी करतात हे समजण्याच्या पलीकडे आहे. या रेती तस्करावर आळा घाला असे निवेदन श्री बालाजी बावणे अध्यक्ष राष्ट्रीय विधी सेवा स्वयंसेवक कल्याण समिती यांनी मा. तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना केले आहे. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार, विलास भोयर व आदी उपस्थित होते.