चिमूर तालुक्यातील सोनेगाव वन परिसरात सोयाबीन उगविलेच नाही.
शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिमूर व संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांना तक्रार देऊन नुकसान भरपाई देण्याची केली मागणी.
Bhairav Diwase. June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- शेतीचा हंगाम सुरू झाल्याने वरदान कंपनीचे सोयाबीन बी बियाणे बाजारपेठेतील कृषी केंद्रात उपलब्ध झालेले असताना सोनेगाव वन येथील बाळकृष्ण जांभुळे या शेतकऱ्याने वरदान कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतीत पेरले असता. पंधरा दिवस उलटून ही ती बियाणे उगविले नसल्याने त्या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिमूर व संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांना तक्रार देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे
सोनेगाव वन येथील बाळकृष्ण शिवराम जांभुळे या शेतकऱ्याने वरदान कंपनीचे सोयाबीन बियाणे खडसगी येथील वैभव कृषी अग्रोमधून 15 बॅग खरेदी केले होते त्या शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या भु क्र 53, 59 ,129 हे आर 4.00 या प्रमाणे शेतात पेरणी करण्यात आली परंतु 15 दिवस उलटले असतांना ही वरदान सोयाबीन बियाणे उगविले नाही याबाबत तालुका कृषी अधिकारी व संवर्ग विकास अधिकारी पस चिमूर यांना तक्रार करण्यात आली तेव्हा जिल्हा कृषी अधिकारी व त्यांच्या चमूने चौकशी करून पाहणी केली.
666 तालुक्यातील शेती हंगाम सुरू झाले असून वरदान कंपनीचे सोयाबीन हे सोनेगाव वन परिसरात उगविले नाही त्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत .
कृषी विभागाने दखल घेऊन तात्काळ त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी बाबा ननावरे यांनी केली आहे.