Top News

बामणी येथील 17 वर्षीय महीलेची नदीत उडी घेऊन आत्महत्या.

नदीतील मृतदेह जिल्हा शोध बचाव पथकाने (पोलीस) यांनी महिला मृतदेह काढला बाहेर
Bhairav Diwase.    July 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील गाव बामणी येथील अक्षता संतोष ईटनकर 17 वर्षीय मुलगी 03/07/2020 जून रोजी वर्धा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली होती. 04/07/2020 नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक सा.चंद्रपुर यांचे आदेशाने दिनांक 04/07/2020 रोजी जिल्हा शोध व बचाव पथकाने(पोलीस दल) बुडालेला मृतदेह काढणे कामी वर्धा नदी कडे (राजुरा) रवाना झाले.


त्यानुसार जिल्हा शोध व बचाव पथक (पोलीस दल) चंद्रपूर यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. दुपारी 01.00 सुमारास सदर मुलीचा मृतदेह मिळाला. जिल्हा शोध व बचाव पथकाने (पोलीस दल) मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृतदेह पोलीस ठाणे, कोठारी . सुपूर्त करून पुढील तपास करीत आहेत.

या शोध मोहिमेत बोट चालक अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते,वामन नक्षीने, उमेश बनकर, दिलीप चौहाण, गिरीश मारापे, समीर चापले, सुजित मोगरे, विकी खांडेकर, अजित बाहे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने