Top News

ऐका ! ना.वडेट्टीवार यांच्या सोबतचा, कोरोना आणि प्रशासनाची तयारी विषयीचा संवाद.

भाग दोनचे प्रसारण दिनांक 4 जूलै शनिवारला सकाळी 10:30 वाजता.

आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारण.
Bhairav Diwase.    July 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपुर:- जिल्हा प्रशासना अंतर्गत कोरोनाच्या काळात जनजागृती विषयीची माहिती घरोघरी व साध्या, सोप्या भाषेमध्ये नागरिकांना माहिती व्हावी यासाठी आत्मभान अभियान सुरू केलेले आहे. या आत्मभान अभियानातील महत्त्वपूर्ण फोन इन कार्यक्रमात राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर नागरिकांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमाचा भाग एक 27 जूनला प्रसारित झाला होता. तर भाग दोनचे प्रसारण दिनांक 4 जूलै शनिवारला सकाळी 10:30 वाजता आकाशवाणी केंद्र चंद्रपूर वरून होणार आहे.

जिल्ह्यामधील अलगीकरणाची व्यवस्था, बाहेर अडकलेल्या मजुरांना सुखरूप स्वगावी पोहोचविणे, उद्रेकाच्या काळातील अतिरिक्त बेडची व्यवस्था, कोरोनाच्या काळामध्ये शेतकरी, व्यावसायिक त्यांच्यासाठी घेण्यात आलेले निर्णय याबद्दल प्रशासनाने केलेली उपाययोजना याबाबत नागरिकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नावर थेट आकाशवाणी स्टुडीओतून ते जनतेशी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला होता.

आकाशवाणी चंद्रपूरची निर्मिती असणाऱ्या या फोन-इन कार्यक्रमाचे आत्मभान अभिनातंर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 4 जून शनिवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून होणार आहे. नागरिकांनी आकाशवाणी केंद्र चंद्रपूरच्या 103 मेगाहर्डस वर तसेच न्यूज ऑन  एअर  या ॲपवर प्रसारण ऐकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने