Click Here...👇👇👇

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सुरक्षारक्षक कार्याकरिता निविदा सादर कराव्यात.

Bhairav Diwase
औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावलीचे आवाहन.
Bhairav Diwase.    July 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावली या संस्थेतील कंत्राटी ठोक मानधनावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती सुरक्षा संस्था सुशिक्षित बेरोजगार सेवा सह. संस्था मार्फत करावयाची आहे. यासाठी सुरक्षारक्षक कार्याकरिता निविदा मागविण्यात येत आहेत.तरी जिल्ह्यातील निविदा धारकांनी  औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली येथे निविदा सादर कराव्यात, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली पी.ए.चोरे यांनी केले आहे.

निविदा धारकाकडे पुढील प्रमाणे कागदपत्रे असावीत. यामध्ये शॉप इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट 1948, खाजगी सुरक्षा यंत्रणेचा परवाना( रेगुलेशन अॅक्ट 2005), पीएफ रजिस्ट्रेशन, इएसआयसी रजिस्ट्रेशन, जीएसटी रजिस्ट्रेशन, प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन, कामगार कल्याण मंडळ रजिस्ट्रेशन, एमएसएम ई रजिस्ट्रेशन, आयएसओ सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न लेटेस्ट प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील.सुरक्षारक्षकांना सुरक्षा सेवेचे प्रशिक्षण दिल्याचे प्रमाणपत्र असल्यास तसेच माजी सैनिकांना प्राधान्य असणार येणार आहे.

सदर कागदपत्रे निविदेसोबत जोडणे आवश्यक राहील. निविदा दिनांक 15 जुलै 2020 पर्यंत रजिस्टर किंवा हस्तदेय बंद लिफाफ्यात पोहोचणे आवश्यक राहील. सदर करार ज्या संस्थेला मिळेल त्यांचा करार हा 11 महिने कालावधीसाठी राहील. निविदेचे सर्व अधिकार प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली यांच्याकडे राहील.