कृषी मंत्री दादाजी भुसे राज्याच्या दौऱ्यावर.

कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे शनिवारी दिनांक 4 व रविवार दिनांक 5 जूलैला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
Bhairav Diwase.    July 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- शेतकऱ्यांमध्ये कृषी योजनाची प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी 1 जुलै ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताह सुरु आहे. यामध्ये सर्व कृषी व कृषी संलग्न विभागाच्या सहकार्याने त्या -त्या विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांशी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त संवाद साधण्यासाठी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या कृषी संजीवनी सप्ताहानिमित्य कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे शनिवारी दिनांक 4 व रविवार दिनांक 5 जूलैला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे.

4 जूलै रोजी सकाळी 8 ते 10  वाजेपर्यंत जिल्हा भंडारा येथे असणार आहेत.सकाळी 10 वाजता निलज जिल्हा भंडारा येथून नवखळा तालुका नागभीड येथे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता नवखळा तालुका नागभीड येथे सोमेश्वर विठोबा देव्हारे या शेतकऱ्यांच्या पेरू प्रकल्पास भेट व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता सायगाटा तालुका ब्रह्मपुरी येथील शिवदास दादाजी कोरे (कृषिभूषण) यांची सेंद्रिय शेती व भाजीपाला लागवड प्रक्षेत्रास भेट देवून कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी 11:30 वाजता सायगाटा तालुका ब्रम्हपुरी येथून नैनपुर तालुका वडसा जिल्हा गडचिरोली कडे प्रयाण करतील. दुपारी 3 वाजेपर्यंत गडचिरोली येथे असणार आहेत.

दुपारी 3 वाजता गडचिरोली येथून हिरापूर जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. दुपारी 3:30 वाजता हिरापूर येथे महिला शेतीशाळा, कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दुपारी 4:30 वाजता हिरापूर येथून मुल कडे प्रयाण करतील.दुपारी 4:45 वाजता मुल येथे हिमालय अॅग्रो फ्रुड्स कंपनीची पाहणी करतील. तसेच पेरीव पद्धतीने धान लागवड व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील.सायंकाळी 5:20 वाजता मुल येथून चिचपल्ली कडे प्रयाण करतील.सायंकाळी 5:25 वाजता चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट देतील. सायंकाळी 6:30 वाजता ‌चिचपल्ली येथून शासकीय विश्रामगृह चंद्रपूर कडे प्रयाण करतील.रात्री शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे मुक्काम असणार आहे.

रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून नंदगूर तालुका चंद्रपूर कडे प्रयाण करतील. 8:30 वाजता नंदगूर येथे भाविक कन्नाके यांचे भात शेतीतील मत्स्यपालन व भाजीपाला लागवड पाहणी व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकरी संवाद असणार आहे. सकाळी  9:15 वाजता नंदगूर येथून हटवंजरी तालुका वणी जिल्हा यवतमाळ कडे प्रयाण करतील. रविवारी दिवसभर यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर सोमवार दिनांक 6 जुलै रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत