Top News

हरांबा सावली मार्गाच्या विद्युत तारेची चोरी, पोलिस कडून चोरी करणाऱ्या टोळीला अटक.

अनुज तारे सहा.पोलीस अधीक्षक उपविभाग मूल यांनी सावली पोलीस स्टेशन येथे भेट देऊन संबंधित प्रकरण निकाली लावल्यामुळे व उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे पोलीस ठानेदार कुमारसिंग राठोड यांना बक्षीसपत्र.
Bhairav Diwase.    July 04, 2020
  

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-
सावली तालुक्यातील हरांबा सफ्टेशनचे नविन वायरिंगचे काम चालू आहे.त्यातच मागील काही दिवसापासून झालेल्या वायरिंगचे तार चोरीला जात असल्याचा प्रकार घडत होता.
या संदर्भात पोलीस स्टेशन सावली येथे फिर्यादी नामे १ ) अमोल गजानन नाडेमवार धंदा विदयुत ठेकेदार रा सावली प्रभाग क १७ ता सावली जिल्हा चंद्रपुर , २) लव शंकरराव गौरकार धंदा नोकरी रा सम्यक नगर कॉलनी सावली ता सावली जिल्हा चंद्रपुर यांनी पो.स्टे. ला येवुन तोंडी तकार दिली कि, कोणीतरी अज्ञात चोरांनी नवीन विदयुत खांबावर लावलेली तार अंदाजे ४ किलोमिटर अंतरावरील चोरून नेली आहे. अश्या तोंडी रिपोर्ट वरून अनुकमे अप क १३५/२०२० कलम- ३७९ भादवी , अप क १३६/२०२० कलम- ३७९ भादवी अन्वये गुन्हे नोंद करून तपासात घेतले . गुन्हे नोंद होताच तात्काळ सदर प्रकरणाची दखल घेत तपास चक्र वेगाने हलवुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेतला असता, गुन्हयातील ४ आरोपींना त्याच दिवशी तात्काळ अटक करण्यात आली . व दोन्ही गुन्हयातील चोरी गेलेला संपुर्ण मुददेमाल इलेक्ट्रिक कंडक्टर वायर किमंत ५,००,०००/ - रू . आरोपीकडुन व्हिडीओग्राफी करून भा.पु.का कलम -२७ प्रमाणे मेमोरंडम पंचनामा करून जप्त करण्यात आला. गुन्हयात वापरलेले सर्व वाहने, मोबाईल तसेच गुन्हयात चोरी केलेला संपुर्ण मुददेमाल जप्त करण्यात आला. तसेच आज रोजी गुन्हयातील ईतर ६ असे एकुण १० आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली.
आरोपी १) नागेश राजु रंगारेड्डी वय ३० वर्ष रा.रय्यतवारी कॉलरी चंद्रपूर २) योगीदास नामदेव सोयाम वय २० वर्ष रा . वलनी ता . जि . चंद्रपूर ३) आकाश गोकुलदास सेडमाके वय २७ वर्ष रा . नवरगाव ता . सिंदेवाही जि . चंद्रपूर ४) प्रमोद देवराव सोयाम वय ३३ वर्ष रा . वलनी ता . जि . चंद्रपूर ५) अब्दुल हमीद कांवीर शेख वय ४४ वर्ष रा . अष्टभुजा वार्ड चंद्रपुर ६) रविंद्र संपत गेडाम वय २१ वर्ष रा . वलनी ता . जि . चंद्रपूर ७) पवन गजानन घोडाम वय २५ वर्ष रा . वलनी ता . जि . चंद्रपूर ८) रनदिप शिवराम आत्राम वय ३७ वर्ष रा . वलनी ता . जि . चंद्रपूर ९) प्रदीप रामु पेंदाम वय ३० वर्ष रा . वलनी ता . जि . चंद्रपूर १०) अनिल दामोधर तोडासे वय वलनी ता . जि . चंद्रपूर
संबधीत सर्व आरोपीकडुन एकुण १) ३ मोटार सायकल किमंत ९०,०००/ - रू, २) ५ मोबाईल किमंत ३०,५०० / - रू, ३) एक टाटा एस मालवाहु वारचाकी वाहन किमंत २,००,००० / - रू , ४ ) चोरी केलेला अॅल्युमिनीअम तार किमंत ५,००,००० / -रू , ५ ) गुन्हयात वापरलेले कटर व झुला किमंत १०,००० / -रू , असा एकुण ८,३०,५०० / - रू चा मुददेमाल आरोपींकडुन हरतगत करण्यात आला. सदर आरोपींना न्यायालयाने दिनांक ०६/०७/२०२० पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये ठेवण्याचा आदेश केलेला आहे. नमुद आरोपीकडुन ईतरही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. सदरची कार्यवाही मा . पोलीस अधिक्षक चंद्रपुर श्री . महेश्वर रेड्डी सर , तसेच मा . सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग मुल श्री.अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुमारसिंग राठोड, सफौ लक्ष्मण मडावी, पोहवा धर्मेन्द्र मुन,पोहवा नारायण सिडाम , नापोशि दर्शन लाटकर, पो.शि. सुमित मेश्राम, पो. शि. दिपक डोंगरे यांनी केली असुन पुढील तपास सावली पोलीस करित आहेत.
अनुज तारे सहा.पोलीस अधीक्षक उपविभाग मूल यांनी सावली पोलीस स्टेशन येथे भेट देऊन संबंधित प्रकरण निकाली लावल्यामुळे व उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे पोलीस ठानेदार कुमारसिंग राठोड यांना बक्षीसपत्र देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने