आत्मनिर्भर भारत विषयावर स्वदेशी अशा संपर्क ऍप च्या माध्यमातून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स मीटिंग.
Bhairav Diwase. July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात पुनर्स्थापन झालेल्या सरकारच्या प्रथम वर्षपूर्ती अभियान अंतर्गत आज भारतीय जनता पार्टी पूर्व नागपूर मंडळासोबत आत्मनिर्भर भारत विषयावर स्वदेशी अशा संपर्क ऍप च्या माध्यमातून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स मीटिंग केली. या मिटिंग च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी देशाचा केलेल्या सर्वांगीण विकासासोबत सीमा सुरक्षा, शेतकरी हितासाठी घेतलेले निर्णय, कलम ३७०/३५ ए चे महत्व, ट्रिपल तलाक रद्द करून मुस्लिम महिलांना दिलेला न्याय अशा अनेक बाबी सहभागिं समोर मांडल्या. देशात सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या अनेक योजनांची माहिती यावेळी हंसराज अहीर यांनी या बैठकीच्या माध्यमातून दिली.
केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी जी यांच्या नेतृत्वात देशात झालेल्या रस्त्यांच्या विकासाचा उंच आलेख सादर करीत नितीनजी यांची दूरदृष्टी व दृढ संकल्पाविषयी सुद्धा अहीर यांनी यावेळी माहिती दिली.
राज्याचे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व खरेदीची हमी दिली होती. खतांचा योग्य व नियोजनबद्ध पुरवठा केला असतांना वर्तमान सरकार यावर पूर्णतः अपयशी ठरली असल्याचे यावेळी हंसराज अहीर यांनी स्पष्ट केले.
या व्हिडीओ बैठकीला क्षेत्राचे आ. श्री. कृष्णाजी खोपडे,
नागपूर महानगर VC संयोजक श्री गिरीश देशमुख, मंडळ अध्यक्ष श्री संजयजी अवचट व अन्य आदरणीय लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.