पूर्व प्रशिक्षण 1 ऑगस्टपासून सुरू होणार.
Bhairav Diwase. July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- आदिवासी उमेदवारांकरीता विविध पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करुन घेण्याकरीता आदिवासी उमेदवाराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण दिनांक 1 ऑगस्ट 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत साडे तिन महिणे कालावधीचे प्रशिक्षण दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासून ऑन लाईन, ऑफलाइन पद्धतीने सुरु होणार आहे. जास्तीत जास्त आदिवासी उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कालावधीत अनुसूचित जमातीच्या (एसटी) प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 27 जुलै 2020 पर्यंत पोस्टाद्वारे, मेलद्वारे किंवा कोरोना या संसर्गजन्य महामारीची काळजी घेऊन स्वतः आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्रमांक 19 या पत्त्यावर सादर करावेत.अर्जामध्ये स्वतःचे पुर्ण नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात),जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक इत्यादी बाबींचा उल्लेख करावा व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्याकरीता एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे.प्राप्त अर्जाची छाननी करुन त्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना भ्रमणध्वनीद्वारे तसेच पत्राव्दारे कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या असणार प्रशिक्षणाच्या अटी:
उमेदवार अनुसूचित जमाती (एसटी) (आदिवासी) प्रवर्गातील असावा.उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 चे दरम्यान असावे. उमेदवार किमान एचएचएससी परिक्षा उत्तीर्ण असावा.उमेदवारांचे नांव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर येथे नोंदणी केलेली असावे.(एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक) या प्रशिक्षणाच्या अटी असणार आहेत.
हि लागणार आवश्यक कागदपत्रे:
शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, मार्कशिट्स (एसएससी/एचएचएससी/पदवी), आधार कार्ड (यूआयडी), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचे नोंदणी कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड) इत्यादी प्रशिक्षणासाठी कागदपत्रे आवश्यक आहे.