अख्खी ट्रॅव्हल्स मधील प्रवाशी कोरोणा पॉझिटिव्ह निघाले.
Bhairav Diwase. July 26, 2020
मुल:- मुल शहरात आणखी पाच मजूरांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यांने, शहर वासीयांत संताप व्यक्त केल्या जात आहे. ३२ मजूर एकाच ट्रॅव्हल्समध्ये बिहार मधून आले होते. यातील २९ मजूरांचे स्वॅब यापूर्वीच पॉझिटिव्ह आले होते, उर्वरित ३ मजूरांचे अहवाल आज आरोग्य प्रशासनास प्राप्त झाले, त्यात हे तीनही मजूर कोरोणा संक्रमीत निघाल्यांने, अख्खी ट्रॅव्हल्स मधील प्रवाशी कोरोणा पॉझिटिव्ह निघाले आहे. एक परप्रांतीय मजूर आधीपासूनच मूल येथे वास्तवास होता, तर राईस मिलमध्ये काम करणारा बोरचांदली येथील एक दिवानजीचा स्वॅब अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेला आहे.
बोर चांदली येथील हा दिवानजी, मागील अनेक दिवसापासून धान खरेदी व इतर अनुषंगिक कामासाठी मूल चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे परिसरात इतर गावात फिरून आपली कामे केलेला आहे. त्याचा अडते, व्यापारी सह अनेकांशी संपर्क आलेला आहे. स्वॅब घेतल्यापासून तो विलगीकरणात होता. त्यामुळे आता त्याचे संपर्कातील नागरिकांचाही स्वॅबची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
लग्न समारंभात ५० च्या वर लोक एकत्रीत आले म्हणून, जानाळा येथील एका गरीब आदिवासी कुटूंबावर गुन्हा दाखल करणारे तालुका प्रशासन राईस मील मालक आणि ट्रॅव्हल्स मालकांवर गुन्हा दाखल का करीत नाहीत? २-३ कोरोणा संक्रमीत निघाले म्हणून लग्नाचे आयोजकांवर गुन्हे दाखल करणारे प्रशासनावर, ३२ संक्रमीत शहरात तयार करणाऱ्यांवर कारवाई करू नये यासाठी कोण दबाव आणीत आहे? असा सवालही शहरात, आणि सामाजीक माध्यमावर चर्चेला जात आहे. याबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशीही मागणी केली जात आहे.
आज पॉझिटिव्ह निघालेल्या मजूर हे ओम साई राईस मील मधील असल्यांची माहिती आहे, तर यापूर्वीचे २९ मजूर हे साईकृपा राईस मील मधील असल्यांचे उघड झाले आहे.
शहरात एकूण ६५ मजूर दाखल झाले होते. या मजूरांना मूल येथील दोन ट्रॅव्हल्सने आणले होते. शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार ५० टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक करण्यांची परवाणगी आहे. असे असतांना, एवढे मजूर दोन ट्रॅव्हल्समध्ये आले कसे? यावर प्रशासनाने अजूनही या ट्रॅव्हल्सवर कोणतीही कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल नागरीक करीत आहे. या ६५ मजूरांपैकी अनेक मजूरांकडे ई-पास देखिल नसल्यांची विश्वसनीय माहीती आहे. दोन ट्रॅव्हल्समध्ये एवढे ‘ई-पास’ धारक मजूर आणणेही शक्य नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून ३० मजुरांना ओम साई मील येथे आणण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्षात ६५ मजुरांना आणण्यात आले. यातील ३२ मजुरांना साईकृपा राईस मिल मध्ये गृह विलगीकरण ठेवण्याची प्रशासनाने मंजुरी दिली. ज्या राईस मिल मध्ये मजूर आणण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती, त्या राईस मिल मध्ये मजुरांना गृह विलगीकरण्यासाठी राईस मिल मालकाचे सांगण्यावरून परवाणगी कशी दिली? हाही एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
या सर्व मजूरांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे बंधनकारक होते. मात्र, स्थानिक राईस मील मालकांनी, या मजूरांचे गृह विलगीकरणाची सुविधा असल्यांचे सांगून, राईस मील मध्ये घेवून गेले. या मजूरांचे स्वॅब तपासणी अहवाल येण्यांचे आधीच, बाहेर राज्यातील आलेल्यांना संस्थात्मक विलगीरण करण्यांचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आदेश धुडकावीत, प्रशासनानेही या मजूरांना या राईस मील मध्ये गृहविलगीकरणाची परवाणगी दिली. एवढया मोठया प्रमाणावरील मजूरांच्या विलगीकरणाची योग्यरित्या सोय आहे की, नाही याची खातरजमा प्रशासनाने केली होती काय? असा प्रश्नही या निमीत्ताने निर्माण होत आहे.
गृह विलगीकरणाची सुविधा असल्यांचे सांगून, ज्या राईस मील मालकांनी हे मजूर घेवून गेले, त्या राईस मील मालकांनी, प्रशासनाचे निर्देश धुडकाविले आहे. कारण या मजूरांचा संपर्क शहरातील नागरीकांशी आल्यांचे स्पष्ट झाले आहे. मात्र या राईस मील मालकांवर अजूनपर्यंत प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही? असा सवालही नागरीक करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत