Top News

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांची नितीन अलोणेला मारहाण करण्याची धमकी.

पोलीस ठाण्यात तक्रार.

Bhairav Diwase.    July 12, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:-
माझे नाव नितीन कालिदास अलोणे असून वय २६ वर्षे जात बौद्ध राहणार घुटकाळा वार्ड नेहरू शाळेच्या मागे तह जिल्हा चंद्रपूर माझा मोबाईल ०८९५६७४९९१२ हा आहे माझा व्यवसाय साऊंड सिस्टीम व डेकोरेशन चा आहे. मागील दीड वर्षा पूर्वी माझ्या व्यवसायाच्या संबंधाने श्री सतीश भिवगडे माझ्या कडे आले व सिंधी पंचायत ग्राउंड रामनगर येथे साजरा करण्यात येत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या डेकोरेशन चे काम मला दिले. ते काम एकूण २,१०,०००/रुपयांत ठरले होते व सतीश भिवगडे यांनी मला ७०,०००/- रुपये रोख ऍडव्हान्स म्हणून दिले व उर्वरित १.४०,०००/- रुपये नंतर देतो म्हणाले मी त्यांच्यावर विश्वास करून काम पूर्ण केले परंतु तेव्हा पासून आजपर्यंत सतीश भिवगडे यांनी उर्वरित रकमेतील एकही रुपया दिला नाही. मी अनेकदा पैसे मागितले असता आज देतो उदया देतो असे म्हणून मला टाळत होते. माझा कॉल सुद्धा उचलत नव्हते. लॉंकडाऊन मूळे या वर्ष्याचे सर्व कामे रद्द झाली असून यामुळे माझी सुद्धा आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. याकरिता मी सतीश भिवगडे ना खुप विनंती करत आहो पण ते मला पैसे देत नाही. काल दिनांक ११ जुलै २०२० ला सायंकाळी ६.०० वाजेदरम्यान मी कामानिमित्त नागपूर रोड ला जात असताना वरोरा नाक्याजवळ सतीश भिवगडे दिसले असताना मी दुचाकी थांबवून त्याच्ये कडे गेलो व माझी दयनीय परिस्थिती सांगून पैसे देण्याची विनंती केली तेव्हा सतीश भिवगडे यांनी मलाच रस्त्यावर घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली तेव्हा मी शिव्या नका देऊ असे म्हणालो, तेव्हा सतीश भिवगडे हे पुन्हा रागात येऊन माझ्या अंगावर चालत येऊन मला म्हणाले “जा तुझे पैसे नाही देत, मी जिल्हाप्रमुख होतो तू माझं काही करू शकत नाही. आणि यानंतर दिसला तर तुझे हातपाय तोडणार यामुळे मी तेथून निघून सरळ रामनगर पोलीस स्टेशन ला जाऊन सतीश भिवगडे यांचे विरोधात तक्रार केली व माझी तक्रार नोंदविण्यात सुद्धा आली. परंतु आम्ही गरीब लोकांवर असे राजकीय लोक अन्याय करीत असेल तर व्यवसायावर अवलंबून असलेले कुटुंब आम्ही कशे सांभाळणार, आम्हाला आमच्याच मेहनतीचे पैसे मागितले तर भर रस्त्यात मारण्याची धमकी देतात. अंगावर चालुन येतात तर आम्ही भीतीपोटी पैसे मागायचे नाही का कोणत्याही बाजूने आम्हा गरिबांचे मरणे होत आहे व म्हणून आपण सर्वांनी मला न्याय मिळवून द्यावा. उद्या जर माझ्या जीविताला काही झाल्यास त्याचे सर्वस्वी जवाबदार हे सतीश भिवगडे राहणार.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने