Top News

कार्यकर्त्यांचा एकजुटपना हाच पक्षाचा खरा आधारस्तंभ:- आ.बंटीभाऊ भांगडीया.

नवनिर्वाचित ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री देवरावजी भोंगळे यांचा सत्कार कार्यक्रम.
Bhairav Diwase.    July 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- सध्या देशात कोरोनाचे संकट सुरू आहे या परिस्थितीत अनेक लोकांचे रोजगार बंद आहेत त्यामुळे अशा अनेक कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय नेरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ने अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप केले त्यामुळे कोरोना टाळेबंदीच्या काळात लाखो कुटुंबातील लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला पक्षाने ईतक्या मोठ्या प्रमाणात कमी वेळात अन्नधान्याची किट वाटण्याचा जो कार्यक्रम राबविला तो केवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांळेच शक्य झाला.भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात आपली सामाजीक बांधिलकी निभावली. चिमूर विधानसभा क्षेत्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता पदाधिकारी बंधू आनी भगिनींनी मोलाचे सहकार्य केले कम्युनिटी किचन मधे भोजन वाढणे, घरपोच भोजन पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा एकजुटपना ही पक्षाची खरी ताकत व आधारस्तंभ आहे असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ)भांगडीया यांनी केले ते चिमूर येथील निवासस्थानी आयोजीत सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

    भारतीय जनता पार्टीचे नेते  चंद्रपूर जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्री देवरावजी भोंगळे यांची भारतीय जनता पार्टी चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर येथील निवासस्थानी सत्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या वेळी  भाजपा चिमूर तालुका कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे वतीने भव्य सत्कार करण्यात आला.श्री देवरावजी भोंगळे मार्गदर्शन करतांना म्हणाले चिमूर तालुक्यातील कार्यकर्ते आमदार बंटीभाऊ यांच्या नेतृत्वाखाली एकजूट असून त्यांनी तालुक्यात पक्षाची बांधणी मजबूत केली आहे परंतु एवढ्यात थांबून चालणार नाही तर पक्ष व त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे गरजेचे आहे पुढे ते पक्ष त्यांनी पक्ष बांधणी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले

 यावेळी चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया, भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष देवरावजी भोंगळे,भाजयुमो चे जिल्हाअध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ.रेखा ताई कारेकर डॉ श्यामजी हटवादे, राजु पाटिल झाडे,प्रकाशजी वाकडे,बांधकाम सभापतीचंद्रपूर, निलमभाऊ राचलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने