चिमूर तालुक्यात युरिया खतांची कृत्रिम टंचाई.

Bhairav Diwase
इतर खते खरेदी केल्याशिवाय युरिया मिळत नाही, कृषी विभागाचे दुर्लक्ष.
Bhairav Diwase.    July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील कृषी केंद्रात पाहिजे त्या प्रमाणात साठा नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.इतर खत विकत घेतल्याशिवाय कृषी दुकानदार युरिया देत नाहीत त्यामुळे निव्वळ युरिया  खतासाठी इतर खत विकत घेणे म्हणजे शेतकऱ्यांना अधिकचा भुदंड आहे.आधीच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी मोठ्या प्रमानात अडचणीत आहेत.

  कृषी विभागाला खतांच्या साठ्याची माहिती विचारली असता तालुक्यात खतांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात येते तर मग युरिया खताची टंचाई कशी? असा दाट प्रश्न आहे,फक्त एकेरी युरिया विकत घेतल्यास शेतकऱ्यांकडून जास्त भाव घेतल्या जात असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे याकडे कृषी विभागाने जातीने लक्ष देऊन प्रत्येक कृषी केंद्रातील युरिया खतांचा साठा तपासून युरिया असतांना कृत्रिम टंचाई करून ज्यादा भावाने विक्री करनाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करून अडचणी सोडवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.