टीसीएसच्या व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र.
Bhairav Diwase. July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टाटा कल्सन्टसी सर्व्हिसेस या कंपनीने देशभरात कॅम्पसमधून नव्या दरम्याच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीत चंद्रपुरातील ५०० युवकांना रोजगार देण्यात यावा. अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे पत्र त्यांनी टीसीएसच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांना पाठविले आहे.