रेती चोरीमुळे त्यात झालेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या आदिवासी महिला प्रकरणी दोषींवर कडक कार्यवाही.

यल्लमा शंकर कोडापे रा. लखामपूर  वार्ड. ही  महिला दिनांक १९ जून २०२० ला. खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता मृत्यू.
Bhairav Diwase.    July 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
दिनांक १०/०७/२०२० ला महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना जिल्हाअध्यक्ष व माजी नगरसेवक (मनपा) मा.बंडूभाऊ हजारे, व संघटनेचे पदाधिकारी शहरप्रमुख कैलास तेलतुंबडे, उपजिल्हाध्यक्ष त्यागी भाई, जिल्हा सचिव अमोलभाऊ मेश्राम, तालुका प्रमुख अशरफ खान ,प्रफुल सागोरे, प्रमोद कोलारकर यांच्या उपस्थितीत रेती चोरीमुळे त्यात झालेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या आदिवासी महिला प्रकरणी दोषींवर कडक कार्यवाही करून त्या गरीब कुटूंबाला न्याय देण्याबाबत पुनर्वसन व ओबीसी कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालक मंत्री  मा.ना.विजयभाऊ  वडेट्टीवार  यांना निवेदन देण्यात आले.
                   यल्लमा शंकर कोडापे रा. लखामपूर  वार्ड. ही  महिला दिनांक १९ जून २०२० ला आपल्या कुटूंबासाठी उदरनिर्वाह  करण्यासाठी  जळाऊ लाकडे जमा करण्यासाठी गेल्या असता सी. टी. पी.एस. यांच्या मालकीच्या जागेवर रेती तस्करी अवैद्यरित्या रेती चोरी केल्यामुळे झालेल्या खड्ड्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. व त्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले त्या महिलेचा (पती) शंकर कोडापे व (मुलगा)  राजेश कोडापे वय ८ वर्ष ,(मुलगा) अर्जुन कोडापे वय ६ वर्ष (मुलगी)पायल कोडापे वय ४ वर्ष  ही लहान मुले असून रेती चोरट्याच्या चुकी मुळे या लहान मुलाच्या डोक्यावरुन मायेचा हाथ निघून गेल्यामुळे या मुलांच्या पालन पोषणावर फार मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्या कुठूबाला आपल्याकडून शासकीय मदत मिळावी व त्या मुलाचे शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देऊ असे निर्देश देण्यात आले. आणि रेती तस्कराची चौकशी  करून  त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री याच्या निर्देशाने देण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या