Top News

प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरज ठाकरे यांना आंदोलन स्थळी जायच्या आधीच गडचांदूर ला अटक.

कामगारांच्या शोषनामुळे न्याय देण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पळून करणार होते आंदोलन.
     Bhairav Diwase.    July 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:-
मौजा नांदा फाटा तालुका राजुरा येथील एल अँड टी सिमेंट कंपनी 350 - 400 कामगारांना जाणीवपूर्वक हेतु परस्पर  मागील दहा वर्षापासून शोषण करीत आहे, या संदर्भात एल सी पासून ते तहसीलदार पर्यंत पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्याची गंभीर बाब आहे. त्याकरिता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शांततेत एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले होते मात्र एल अँड टी कंपनीने पोलिस विभागाशी संगणमत करून सुरजभाऊ ठाकरे हे कामगारांना दिलासा आणि आश्वासन देण्याकरिता व शांततेत आपल्या हक्काची लढाई करीत असलेयल्या कामगारांना भेट देण्याकरिता जात असताना गडचांदूर येथे, काही कारण नसताना इतर राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन पोलीसांनी   मध्येच त्यांना अटक केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने