Top News

राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष कक्कड विरुद्ध खंडणी प्रकरणात तक्रार दाखल.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन. शिंदे ह्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व रामनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली दाखल.
Bhairav Diwase.    July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड़ यांच्या विरुद्ध एका न्यायप्रविष्ट प्रकरणात पैशाची मागणी करणे, खंडणीसाठी तगादा लावणे, अधिकाऱ्यांना धमकावणे व पैसे न मिळाल्यास ब्लॅकमेल करणे, तथा वारंवार कार्यालयात येऊन त्रास देणे याप्रकरणी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन. शिंदे ह्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व रामनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजीव कक्कड यांनी ऐकीव माहितीच्या आधारे एका न्यायप्रविष्ट प्रकरणात पोलीस विभागाची दिशाभूल केली, इतकेच नाही तर सदर प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसताना केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी पैशाची मागणी केली.
त्यांच्या मागणीनुसार पैसे न दिल्याने बर्‍याच दिवसांपासुन त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ब्लॅकमेलिंग करणे सुरू केले आहे.  
इतकेच नाही तर एका प्रकरणात मोटार वाहन निरीक्षक सुबोध नळकांडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असुन प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ह्या प्रकरणात सुद्धा त्यांनी पैसे उकळण्याच्या प्रयत्न सुरू केला अशी तक्रार करतानाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे ह्यांनी केली आहे.              
       

      उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे ह्यांची तक्रार केल्यामुळे त्यांनी आपल्याविरुद्ध तक्रार केली. त्यांनी पुरावे सादर करावे अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू:- राजीव कक्कड

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने