Top News

महानगरपालिका गाळेधारकांचे कोरोना काळातीळ टॅक्स व रेट माफ करावे.

ना. पालकमंत्रयांनी या संबंधाने पुढील आठवड्यात मनपा आयुक्तांची आढावा बैठक लावून या वर योग्य तोडगा काढण्याचे अश्वास.
Bhairav Diwase.    July 11 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोना काळातील महानगर पालिका ने ठराव घेऊन सर्व गाळेधारकांचे टॅक्स व रेट माफ करावे. हे गाडेधारक अनेक वर्षा पासून नियमित टॅक्स व रेट अदा करत आले आहे. या करिता  जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार याना संजय गांधी मार्केट असोसिएशन, सिविल लाईन्स वॉर्डस, च्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
ना. पालकमंत्रयांनी या संबंधाने पुढील आठवड्यात मनपा आयुक्तांची आढावा बैठक लावून या वर योग्य तोडगा काढण्याचे अश्वास दिले. 
या शिष्टमंडळात संजय गांधी मार्केट असोसिएशन चे अध्यक्ष श्रीरिष रेगुडवार, सचिव प्रकाश देवतळे, व पद्धधिकारी संदानंद खत्री, राम चांदे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने