घुग्गुस ग्राम पंचायती ला नगर परिषेदेचा दर्जा द्यावा. पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार याच्या कडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे चि आग्रही मागणी.

पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पुढील आठवड्यातील कॅबिनेट बैठकी पुढे नगर परिषदेचा प्रस्ताव आणू व घूगगूस ग्राम पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा  मिळेल असे ठोस आश्वावासन.
Bhairav Diwase.    July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- घूग्गूस ग्राम पंचायतीला लवकरात लवकर नगर परिषदेचा दर्जा मिळावा या करिता आज नियोजन भवनात जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार  याना निवेदना द्वारे पुनश्च काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी  आग्रही मागणी केली आहे.
पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पुढील आठवड्यातील कॅबिनेट बैठकी पुढे नगर परिषदेचा प्रस्ताव आणू व घूगगूस ग्राम पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा  मिळेल असे ठोस आश्वावासन दिले. या वेळी काँग्रेस जिल्हाधयक्ष प्रकाश देवतळे, माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, माजी युवक अध्यक्ष शिवा राव, जिल्हा सचिव उत्तम ठाकरे, युवक जिल्हाधयक्ष हरीश कोटावार, एसी सेल अध्यक्ष पवन आगदारी, सुरज कन्नूर  व मोठ्या संख्येने काँग्रेस पद्धधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने