Top News

ग्रामीण तालुका भागातील ऑटोरिक्षा चालकांना प्रवासी वाहतुकीची परवानगी द्या:- विदर्भ ऑटो रिक्षा चालक कामगार संघटना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण तालुका ठिकाणातील काळीपिवळी तसेच ऑटोरिक्षा चालकांना तातडीने संबंधित भागातील पंचायतराज संस्थेच्या विविध शाखेतून अन्नधान्य /किराणा किट तसेच आर्थिक १०,००० रुपयांची मदत मिळण्यासाठी मा. ना. विजय वडेट्टीवार पालकमंत्री यांना विदर्भ ऑटो रिक्षा चालक कामगार संघटना चंद्रपूरच्या वतीने मागणीचे निवेदन
Bhairav Diwase.    July 11, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार असून या जीवघेण्या दुर्धर आजारापासून देशातील दिल्ली ते गल्ली सुद्धा अलगिकरणात राहू शकले नाही . त्यामुळे कोरोनाने सर्वत्र झोडपून काढले असून ऑटोरिक्षा चालकांचे पूर्णतः कंबरडे मोडले आहे. 
           राज्यव्यापी कोरना महामारीच्या टाळेबंदी काळातील मागील 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस आर्थिक संकटात सापडलेले चंद्रपूर जिल्ह्यातील ऑटोरिक्षा आणि त्यामुळे परिवारावर आलेली उपासमार तसेच होणाऱ्या हालअपेष्ठेचा नाहक त्रास सहन करावे लागत आहे .
              आजच्या भयानक आणि निराशाजनक वातावरणात जीवघेण्या प्रलयाने सर्वांना भयभीत करून सोडलेल्या कोरोना महामारीमुळे विदर्भातील संपूर्ण ऑटोरिक्षा चालकांचे सर्वतोपरी कमाईचे साधन रस्त्यावर धावत नसून आर्थिक अडचणींच्या डावपेचात सापडलेल्या ऑटोरिक्षा चालकाचे पार कंबरडे मोडले आहे . त्यामुळे   त्यांचा मुख्य आधारस्तंभ हरविला असून पूर्वीचेच अठराविश्व दारिद्रमय जीवन परत आले आहे .त्यामुळे 20 जूनला नवीन शासकीय परिपत्रकानुसार शहरी भागातील ऑटोरिक्षा चालकांना दोन प्रवाशांसह मुभा देण्यात आली , मात्र ग्रामीण तालुका भागातील ऑटोरिक्षा चालकासंबंधी असे कोणतेही शासनातर्फे परिपत्रक किव्हा जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आलेले नाही . 
               मागील तीन महिन्यांपासून विदर्भ ऑटोरिक्षा चालक कामगार संघटना यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे कार्यालयात ग्रामीण तालुका भागात ऑटोरिक्षा चालविण्यास परवानगीबाबत वारंवार निवेदन सादर केले असून या निवेदनाची प्रशासकीय स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नसून उलट ऑटोरिक्षा वाहनांना रोडवर आणू नये अशी सक्त ताकीद संबंधित तालुका पोलीस स्टेशनंतर्गत देण्यात आली . वर्षांनुवर्षे शासनाच्या तिजोरीला हातभाराची भूमिका साकारणाऱ्या विशेषतः तालुका आणि ग्रामीण भागातील ऑटोरिक्षा चालक कामगारांकडे दुर्लक्ष होत आहे असे नाराजीचे सूर ऑटोरिक्षा चालक कामगार संघटनेकडून उमटत आहेत. एकतर्फी शहरी भागांना दोन प्रवाशांसह मुभा तर ग्रामीण भागांना पूर्णतः बंदी अशा दुटप्पी निर्णयामुळे ग्रामीण तालुका ऑटोरिक्षा चालक कामगारांवर अन्याय होऊन पार हतबल आणि उदासीन नैराश्यामय तनावाच्या मानसिकतेत जीवन व्यतीत करीत असून " जगावे की मरावे"अशी भुकेने व्याकुळ पाण्यातील माश्यांच्या मागे खोल डोहात गिरट्या घालणारी स्थिती निर्माण झाली आहे .
            त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा चालकांच्या हाताला काम नसल्याने घरातील वीज बिल , गॅस सिलेंडर, बँकेच्या हप्त्याचे व्याज, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा, विना कामधंद्याने कसे पूर्ण करायचे हा अतिशय गहन आणि तितकाच गंभीर चिंतेचा विषय संपूर्ण तालुका तसेच ग्रामीण ऑटोरिक्षा चालकांपुढे निर्माण झाला असून 10,000 रुपयांची आर्थिक मदत ,अन्नधान्य तसेच किराणा किट मिळून जिल्ह्यातील ग्रामीण तालुका भागातील ऑटोरिक्षा वाहन कामगारांना पोलीस प्रशासनाच्या बंधनातून परवानगी मिळवून देण्याबाबत विदर्भ ऑटोरिक्षा चालक कामगार संघटना चंद्रपूर यांनी मा. ना. विजय वडेट्टीवार पुनर्वसन मदत, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांना मागणीचे निवेदन दिले . 
              यावेळी विदर्भ ऑटोरिक्षा चालक कामगार संघटना चंद्रपूरचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा. दिपक दाजगाये,  तसेच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा. मोक्षविर लोहकरे  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने