Click Here...👇👇👇

सायमरा येथील पुलाचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम, अभियंत्याचा पुण्यप्रताप.

Bhairav Diwase
1 minute read
निकृष्ठ पुलाचे बांधकाम करणाऱ्या अभियंत्याच्या चौकशी मागणी सायमरा गावातील नागरिक करीत आहे.
Bhairav Diwase.    July 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली
सावली:- सावली तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेले पाथरी  - सावली मुख्य रस्त्यापासून २ किमी आतील निसर्गाच्या सानिध्यात हिंस्त्र प्राण्यांनी जंगलव्याप्त सायमरा हे अतिदुर्लक्षित गाव आहे . दुर्लक्षित तसेच विकासापासून दूर असलेल्या सायमरा गावाला समाजाच्या आणि दळणवळणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्त्यावर पुलाची  निर्मिती करण्यात आली .

             सावली तालुक्यातील अतिसंवेदनशील दुर्लक्षित भाग असलेल्या आदिवासीबहुल सायमरा गावाला जीवनप्रवाह गतिमान होण्यासाठी समाजाच्या आर्थिक आणि इतर गोष्टींना जीवनमान उंचावण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी गावापासून २किमी पाथरी ते सावली मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले असून याच रस्त्याला जोडणारा सिमेंट काँक्रीट चे पूल आहे . या पुलाची निर्मिती अभियंत्यामार्फत सन २०१९-२०२० साली करण्यात आली असून पुलाला १ वर्ष झाले असता पुलाच्या मध्यभागी सिमेंट काँक्रीट निघाले असून त्यातील सळाखी बाहेर निघाल्या आहेत. 

            सायमरा वासीयांच्या आर्थिक, आरोग्य  तसेच दळणवळणाच्या सोयी सुलभ होण्यासाठी वाहणाऱ्या नाल्यावर पूल तयार करण्यात आले. परंतु पुलाच्या बांधकामाच्या १ वर्षापेक्षा जास्त काळ लोटला नसता संबंधित पुलाच्या मध्यभागी सिमेंट काँक्रीट निघाले असून मोठे भगदाड पडून सळाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे सायमरा वासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावे लागत असून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . आशा निकृष्ठ कामाला जबाबदार कोण असा सवाल येथील जनता करीत असून गावात रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे या निकृष्ठ पुलाचे बांधकाम करणाऱ्या अभियंत्याच्या चौकशी मागणी सायमरा गावातील नागरिक करीत आहे.