चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१३.

Bhairav Diwase
हैदराबाद येथून आलेली गोंडपिंपरी तालुक्यातील चेक दारूर येथील १९ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह.
Bhairav Diwase.    July 1 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्ह्यात करोना बाधित आढळले आहेत. परिणामी बाधितांची एकूण संख्या २१३ झाली आहे. यापैकी ११३ बाधित कोरोनातून बरे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १०० बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी १७ जण जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जण अन्य राज्याचे रहिवासी आहे.

पुणे येथील २२ वर्षीय राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा जवान संस्थात्मक अलगीकरणात होता. चंद्रपूर शहरातील संजय नगर दुर्गावार्ड परिसरातील ३० वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बालाघाट येथून आल्या नंतर संस्थात्मक अलगीकरणात होता.

चंद्रपूर शहरातील दुसरा पॉझिटिव्ह ठरलेला २३ वर्षीय युवक बाबुपेठ येथील असून एका कंपनीत काम करीत होता. यापुर्वी या कंपनीतील दोन जण पॉझिटीव्ह ठरले आहे.त्यांच्या संपर्कातील हा बाधित होता.

हैदराबाद येथून आलेली गोंडपिंपरी तालुक्यातील चेक दारूर येथील १९ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती संस्थात्मक अलगीकरणात होती. नकोडा येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती दुमरान बिहार येथून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्यक्ती देखील संस्थात्मक अलगीकरणात होता.