मॅजिक परिवाराने त्यांचे अभिनंदन मानून त्यांना भावी उज्ज्वल आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा.
Bhairav Diwase. July 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- संपूर्ण जग तसेच देश कोरोना विषाणूच्या विळख्यात असून त्यापासून राज्याची सुद्धा सुटका झाली नाही . त्यामुळे लोक हिताच्या आरोग्याच्या दृष्टीने ३ महिने टप्याटप्याने लॉकडाऊन करण्याचा केंद्राने निर्णय घेतला होता. लॉकडाऊनमुळे दिल्ली ते गल्ली पातळीवर याचे भीषण परिणाम अनुभवास येऊन त्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकाला होऊन पार होरपळून निघाला . त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची या लॉकडाऊनच्या काळात कंबरडे मोडले असून आर्थिक चणचण निर्माण होऊन आठराविश्व दारिद्र्य त्यांच्या पदरी आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भीसी शहरात असाच प्रसंग येथील मॅजिक विद्यार्थ्यांवर आला . लॉकडाऊनमुळे हाताला असलेले काम बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या दैनंदिन आर्थिक जीवनाचे चक्र थांबले असून जगावे की मरावे अशी द्विधा मनस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे .
या घटनेची स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच दिनांक १ जुलै २०२० रोजी मा. राजुभाऊ गायकवाड ( अर्थ व बांधकाम सभापती जि. प. चंद्रपूर) यांच्या ४६ वाढदिवसाचे निमित्य साधून भीसी शहरातील स्थानिक मॅजिक उपक्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन कार्याचे कौतुकास्पद प्रशंसा करत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता गहू, तांदूळ, डाळ, तसेच संपूर्ण किराणा साहित्य आणि रोख रक्कम १००० रुपये देऊन मदत केली. मॅजिक परिवाराने त्यांचे अभिनंदन मानून त्यांना भावी उज्ज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी मा. विलास झिले टेमृडा, मा. करण भुसारी व मित्र परिवार मोहबाला , मा. निखिल हिवरकर सरपंच निलजई, मा. विलास चौधरी विदर्भ संघटक , राजू श्रीरामे सांस्कृतिक प्रमुख वरोरा व आसाला मित्र परिवार उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत