जनतेने विज बिल भरु नये - चंद्रपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आवाहन

Bhairav Diwase
घुग्गुस येथील गांधी चौकात भाजप तर्फे विज बिलाची होळी.
Bhairav Diwase.    July 0 3, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- आज दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घुग्गुस येथील गांधी चौकात भाजपाच्या वतिने विज बिलाची होळी करुन ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला.

कोरोना काळात विज वितरण कंपनीने मार्च महिण्यापासुन रिडींग न घेता सरासरी विज बिल ग्राहकांना दिले.
त्यामुळे राज्य भरातील जनतेत असंतोष निर्माण झाला. भरमसाठ विज बिल घरगुती ग्राहकांना दिल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटामुळे जनतेला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. तिन महिण्याचे वीज बिल माफ करा अशी मागणी घुग्गुस भाजपा च्या वतिने करण्यात आली आहे.
राज्यभरात याचे पडसाद उमटत असतांना जिल्ह्यात पहिल्यांदाच घुग्गुस भाजपाच्या वतिने विज बिलाची होळी करुन ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ठाकरे सरकार हाय हाय अशी प्रचंड नारेबाजी व घोषणा बाजी करण्यात आली. 

यावेळी चंद्रपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, चंद्रपुर पं स उपसभापती निरिक्षण तांड्रा, प्रभारी सरपंच संतोष नुने, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गोडसेलवार, प्रकाश बोबडे, संजय तिवारी,साजन गोहने,सिनु इसारप, विनोद चौधरी, सुचिता लुटे, सुनंदा लिहीतकर, भाजपा नेते संजय भोंगळे, मल्लेश बल्ला, बबलु सातपुते, दिलीप कांबळे, अमोल थेरे, प्रविण सोदारी,रज्जाक शेख, इम्तीयाज अहमद, विनोद जिंजर्ला उपस्थित होते.