Top News

पंचायत समिती पोंभुर्णा येथे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर माता आणि स्तनदा माता यांना बाळाच्या जन्मानंतर सुरक्षिततेसाठी म्हणून बेबी केअर किटचे वितरण.

महिला व बालकल्याण सभापती सौ नितुताई चौधरी यांचे हस्ते वाटप
Bhairav Diwase.   July 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोनाच्या वैश्विक महामारी संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आमचे पोलिस, अधिकारी, डॉक्टर्स सेवा देत असताना शेकडो आशा वर्कर, अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून लढा देत आहेत. कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पोलिस, अधिकारी, डॉक्टर्स इ. अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे त्यांना पण कोरोनाची बाधा होत आहे.

आणि गरोदर माता आणि स्तनदा माता यांना बाळाच्या जन्मानंतर सुरक्षिततेची काळजी म्हणून, पोंभुर्णा तालुक्यातील पंचायत समिती पोंभुर्णा येथे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर माता आणि स्तनदा माता यांना बाळाच्या जन्मानंतर सुरक्षिततेसाठी म्हणून बेबी केअर किटचे वितरण महिला व बालकल्याण सभापती सौ नितुताई चौधरी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. 

यावेळी अल्का आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा, विनोद देशमुख सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा, गंगाधर मडावी सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा, धनंजय साळवे गट विकास अधिकारी, मेरघळ सिडीपीओ सौ. श्वेता वनकर अध्यक्षा नगरपंचायत पोंभुर्णा, सौ. रजिया कुरेशी उपाध्यक्षा नगरपंचायत पोंभुर्णा, सौ. सुनिता मँकलवार नगरसेविका, सौ. नेहा बघेल नगरसेविका, सौ. शारदा कोडापे नगरसेविका, आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने