राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करा. भाजपा तालुका पोंभुर्णा यांची मागणी.

Bhairav Diwase
राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकावर तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची भाजपा तालुका पोंभुर्णाने केली मागणी.
Bhairav Diwase.    July  10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला यात राजगृहाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी. मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह आहे हे राजगृह या देशातील तमाम आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान आहे राजगृह या देशाच्या ऐतिहासिक वारसा असून या ऐतिहासिक वारशाला काही जातीयवादी व समाजकंटकांनी  राजगृहाची तोडफोड केली पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना न शोभणारी असून यामुळे देशातील तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेत असंतोषाची लाट पसरलेली असून राजगृहावर हल्ला हल्ल्याचा 'राजगृह' प्रकरणावरून आपल्यातील काही मंडळी संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करताय. आज घटना होऊन तीन-चार दिवस झाले आहेत. स्कॉटलँड यार्डनंतर जगात मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाचा डंका पिटणार्यांनी ह्या आरोपीला पोलीस अजून अटक का करू शकले नाहीत?  यावर कोणीच काही बोलत नाहीये.
'राजगृह' फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान नाहीये, तर जगभरातील आंबेडकरवाद्यांसाठी ज्ञानाचा, प्रेरणेचा स्रोत आहे. त्या आरोपीला तातडीने अटक करून, सखोल चौकशी करणे. त्यामागचा मास्टरमाइंड शोधणे, दगडफेक करणाऱ्याला कोणी सूचना देत होते का? ते शोधणे गरजेचे आहे.
या घटनेतील आरोपींना अटक करून त्याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणणे ही जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. सरकारने जनतेचा क्षोभ होण्याआधी आरोपिंना गजाआड करणे गरजेचे आहे. या सर्व घटनेचे आम्ही भारतीय जनता पार्टी पोंभूर्णा तालुका  कार्यकर्ते आणि नागरिक तीव्र निषेध करतो.
राजगृह ची तोडफोड करणाऱ्या समाज कंटकाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी पोंभुर्णा तहसीलदार साहेब यांना भाजपा तालुका पोंभुर्णा यांनी मागणी निवेदन दिले.

 यावेळी  गजानन गोरटींवार तालुकाध्यक्ष भाजपा पोंभुर्णा,  कु. अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा,  सौ. श्वेता वनकर अध्यक्ष ,न .प पोंभुर्णा  ईश्वर नैताम महामंत्री भाजपा तालुका पोंभुर्णा, अजित मंगळगीरीवार नगरसेवक, सुनिता मॅकलवार नगरसेविका, नेहा बघेल नगरसेविका, शारदा कोडापे नगरसेविका, दिलिप मॅकलवार शिक्षक, संजय कोडापे, माजी सरपंच अजित जंबुलवार, व सर्व पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.