चिमूर तालुक्यातील प्रस्तावित बंदर नवीन कोळसा खाणीला विरोध का?

Bhairav Diwase
तरुणांना ,बेरोजगारांना रोजगाराच्या संधी ला आळकाठी का?:- हरीश पिसे
Bhairav Diwase.    July 28, 2020



(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- काही गावे ही जंगल क्षेत्रात येतात त्यांच्या शेताच्या सभोवताल वने आहे. अशा शेतीतील पिक वन्यप्राणी खाऊन टाकतात व जास्त प्रमाणात नुकसान सुध्दा करतात.
त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना अत्यंत नुकसान सहन करावी लागतो. वन्यप्राणी गावात येतात गावकरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो व कधी-कधी त्यांच्यावर हल्ला होऊन जीवित हानी सुध्दा होते.
त्या शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या दुःखांकडे,परिस्थिती कडे कुणाचेही,कोणत्याही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचे व वन्यप्रेमींचे किंबहूना लक्ष सुद्धा जात नाही.मात्र आता नवीन  होऊ घातलेल्या बंदर कोळसा खदणीला विरोध का ,बेरोजगार, तरुणांना व स्थानिक शेतकरी, रहिवासी यांना संधी उपलब्ध होत असतानाच विरोध का असा सवाल भाजपचे युवा कार्यकर्ते हरीश पिसे यांनी केला आहे .
                वर्षोनुवर्षे जनगली जनावरांच्या दहशत मध्ये शेतकरी ,शेतमजूर आपला जीव धोक्यात घालून आपला  शेती ,मजुरी करून उदरनिर्वाह करीत असतात त्यांचा वाली कोणीही नाही. तेव्ह चिमूर तालुक्यात  होणाऱ्या बंदर कोल माईन्स त्यांच्या क्षेत्रात होत आहे. त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचे,नोकरी ,रोजगार  साधन निर्माण होऊ शकते. पण 
खदानीला विरोध कशाला? चंद्रपुर जिल्ह्यातील वनक्षेत्राला लागून असलेली सर्व कोल माईन्स व प्रदूषण निर्माण करणारे व वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचवणारे उद्योगधंदे प्रथम बंद करा नंतर चिमूर क्षेत्रातील कोल माईन्स बंद करण्याच्या गोष्टी करा. असा इशारा हरीश पिसे यांनी दिला आहे नाहीतर हा चिमूर तालुक्यावर अन्याय होईल.असे हरीश पिसे यांनी म्हटले आहे.

*बंदर कोलमाईन्स सुरू झाल्यास चिमुर तालूक्यात बरिच प्रगतीचे मार्ग -व्यापारी मंडळ अध्यक्ष बारापात्रे*

चिमूर तालुक्यातील बंदर कोळसा खदान सुरु  झाल्यास बरेच  मार्ग प्रगतीचे ठरेल असे मत चिमूर व्यापारी मंडळाच्या अध्यक्ष प्रमोद बारापात्रे यांनी व्यक्त केले असून  काही व्यक्ती ,समाज संघटना अन्यायक विरोध दाखवित  असून आपले प्रतिष्ठा व मान मिळविण्यासाठी फार दुरून चिमुर मध्ये प्रवेश करून ज्यापद्दतिने विरोध करून चिमूर तालुक्यातील बंदर खदान मुळे होनारा गरीबाचा फायदा खपत नसून  जानून जाणून पर्यावरणाचा नाव लावून मुर्ख  बनवित आहेॆ.
     विरोध करणाऱ्यांना तालुक्यातील बेरोजगारी दिसत नाही  ऐवढे नखरे कशा साठी यांना वेगळी भुक आहे. म्हंतात चोर चोर मावस भाऊ मी. यांना सांगू ईच्छीतो की आपण किती झाडे लावले व जगवले याचे पुरावा द्यावा नंतरच जनतेवर अन्याय करावा. असे व्यापारी मंडळाच्या अध्यक्ष प्रमोद बारापात्रे यांनी म्हटले आहे .