Top News

लाकडाऊनच्या काळात महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत विविध मागण्यांसाठी आंदोलन.

राजुरा भारतीय जनता पक्षाचे वतीने महाराष्ट्र सरकार विरोधात विज बिल होळी आंदोलन.
Bhairav Diwase.    July 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- आज दिनांक 17/06/2020 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता चे दरम्यान भारतीय जनता पक्ष राजुरा च्या वतीने  विज बिल ग्राहकाचे माफ व अन्य मागण्याची पूर्तता करण्याकरिता भाजपा द्रारा धरणे वा आदोलन तहसील कार्यालय समोरील  परिसर चे बाजुला संचारबंदी  चे नियमाधिन  राहून  करण्यात आले.                                        
    राज्य सरकार द्रारा विजबिल ग्राहकाचे  माफ करणे आवश्यक असुन संचारबंदी कालावधीत अमाप पणे जास्त आकारणी करून  महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण विभाग कंपनी द्रारा विज बिल भरणा रक्कम मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आली आहे. यात मध्यम ,सामान्य लोकाचे आर्थिक शोषण होत आहेत. कोरोणाचे पार्श्वभूमीवर अनेक उद्योग , धंदे बंद आहे. त्यामुळे कामगाराना उपासमारी असताना अवैध आलेले विज बिल भरणा आकारणी करणे शक्य नाहीत. व्यापारी व शेतकरी सुध्दा अडचणी मध्ये सापडले आहेत . तसेच नौकरी वर्गातील कर्मचारी सुध्दा नाराज असुन नो वर्क नो पेमेंट या धोरणामुळे त्याना सुध्दा आर्थिक सामाना करावा लागत आहे. कोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या तीन महिन्‍यापेक्षा जास्‍त कालावधीपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्‍यामुळे गोरगरीब जनता संकटात सापडली आहे. कष्‍टकरी वर्ग, शेतकरी बांधव आदी घटक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. मोठया प्रमाणावर विज बिले नागरिकांना प्राप्‍त झाली आहे. ते भरण्‍यास नागरीक पूर्णपणे असमर्थ आहेत. त्‍यामुळे सदर विज बिल माफ करण्‍यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी राजुरा च्या वतीने करण्यात आले. तसेच एप्रिल 2020 पासून केलेली विजेची दरवाढ मागे घेण्‍यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
   चंद्रपूर जिल्‍हयात रमाई आवास योजनेअंतर्गत चौदा हजारापेक्षा जास्‍त लाभार्थी आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्‍यांना न मिळाल्‍यामुळे सदर नागरिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. तो निधी सुध्‍दा तातडीने देण्‍याची आवश्‍यकता आहे.  विद्यमान शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अद्याप अनेक शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे तसेच अनेक शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन सुध्‍दा झालेले नाही. काही शेतकरी चे पनर्गटण न विचारता केले आहेत. त्‍यामुळे हंगामाच्‍या तोंडावर शेतकरी आर्थिकदृष्‍टया हवालदिल झालेला आहे. या आर्थीक संकटातुन शेतक-याला बाहेर काढण्‍याची आवश्‍यकता आहे. तसेच शेतक-यांना युरीया व संबंधित खते तातडीने उपलब्‍ध करण्‍याची आवश्‍यकता आहे. याबाबतीतचे निवेदन देण्यात आले. 
   सोबतच भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील  “ राजगृह “ या निवासस्थानावर भ्याड हल्ला करुन तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरीत कारवाई करावी. स्वत:ला पुरोगामी राज्याचे कर्तेधर्ते समजणाऱ्या राज्यकर्त्यांच्या या राज्यात अशी घटना होणे भुषणावह नसुन याची तीव्र शब्दात निंदा करून तीव्र निषेध करण्यात आले. शेतकऱ्यांना तसेच बारा बलुतेदार व गोरगरीबांना राज्‍य सरकारतर्फे पॅकेज देण्‍यात यावे अशी मागणी सुद्धा भाजपद्वारे करण्यात आले. 

 अशा परिस्थितीत सर्वांना दिलासा मिळावा म्हणून भाजपा द्रारा विज बिल शासनाने माफ करावे म्हणून सर्वच स्तरावर आज आदोलन वा धरणे करण्यात आले आहे.
   यावेळी माजी आमदार ऍड. संजयभाऊ धोटे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, भाजपा नेते सतीश धोटे, भाजपा नेते विनायक देशमुख, नगरसेवक राधेश्याम अडानिया, भाजपा महामंत्री प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, गणेश रेकलवार, सुरेश रागीट, सचिन डोहे, सचिन शेंडे, हरिदास झाडे, जितेंद्र देशकर, मोहन कलेगुरवार, संदीप पारखी, राहुल थोरात, छबिलाल नाईक, सुधीर अरकिलवार, रत्नाकर पायपरे,  कैलास कार्लेकर तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने