Top News

सावली येथील तहसील कार्यालय सावली येथे भाजपा तर्फे विज बिल माफ करण्याचे निवेदन दिले.

सावली तालुका भाजपातर्फे आघाड़ी सरकारचा निषेध करण्यात आला.
Bhairav Diwase.    July 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- आज दिनांक १७ जुलै रोजी तहसील कार्यालय सावली येथे भाजपाच्या वतिने गोरगरिबांचे विज बिल माफ करने, शेतक-यांचे कर्ज माफ करने व खतांचा पुरवठा करने, रमाई आवास योजनेचे पैसे देने, बारा बलुतेदार व गरिबांना पॅकेज देने, राजगॄहातील हल्लेखोरांवर कठोर कारवाही करने अश्या विविध मागण्याकरीता निवेदन देण्यात आले. भाजपा च्या वतिने विज बिलाची होळी करण्यात आली होती व आघाड़ी सरकारचा निषेध करण्यात आला होता.
कोरोना काळात विज वितरण कंपनीने सरासरी विज बिल ग्राहकांना दिले. त्यामुळे राज्य भरातील जनतेत असंतोष निर्माण झाला. भरमसाठ विज बिल घरगुती ग्राहकांना दिल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

उपस्थित माजी बांधकाम सभापती संतोष सावकार तंगपल्लीवार, तालुकाअध्यक्ष अविनाशभाऊ पाल, तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, अर्जुन भोयर,मानसी लाटेरवार, सावली श.अध्यक्ष आशिष कार्लेकर, तालुका सो.मि.सेल मयुर व्यास, मयुर गुरनुले अनेक पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने