Top News

पोंभुर्णा तालुक्यातील नविन गंगापुर येथील जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात १ गाय ठार तर १ गाय गंभीर जखमी.

श्री अनिल सोपनकार यांच्या मालकीच्या गायीला वाघाने ठार केले. तर दीपक वाघाडे यांच्या मालकीच्या गायीला जखमी केले.
Bhairav Diwase.    July 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील नविन गंगापुर येथील जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात १ गायी ठार तर १ गाय गंभीर जखमी केलेली घटना कक्ष क्र,92 च्या समोर, आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. श्री अनिल सोपनकार यांच्या मालकीच्या गायीला वाघाने ठार केले. तर दीपक वाघाडे यांच्या मालकीच्या गायीला जखमी केले आहे. नविन गंगापुर येथील शेतकऱ्यांची जनावरे गुराखी दररोज प्रमाणे जंगलाच्या चराई साठी घेऊन गेले असता या जनावरांचा कळपावर अचानक एक वाघांनी हल्ला केल्याने त्यात एक गाय ठार झाले असून एक गाय जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गुराखी घाबरून गावाकडे आरडा ओरड करीत गावाकडे धाव घेतली सदर घटनेची माहिती गावात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव धरले. शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अशी आशा व्यक्त केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने