Top News

मुख्यालयी राहण्याचे सभापती विजय कोरेवार यांचे निर्देश - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न.

कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात रोखण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले.
Bhairav Diwase.    July 03, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे मात्र सावली तालुक्यात अजूनपर्यंत कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे पुढेही हा धोका टाळावा याकरीता पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी सर्व विभागांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे.
       चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढून रुग्ण संख्या शंभराच्या वर झाली आहे. मात्र सावली  तालुका कोरोना विषाणूच्या सन्सर्गापासून अजूनही मुक्त आहे परंतु जिल्ह्यातील इतर तालुक्यातून व गडचिरोली जिल्ह्यातून सावली पंचायत समिती अंतर्गत शिक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक व पंचायत समितीचे कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरून येत असतात. नुकतेच तालुक्यातील जागरूक नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले  व प्रसार माध्यमांनी याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. याची दखल घेत कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात रोखण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने