Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील कुस्तीगीरांची शिष्यवृत्ती प्राप्त.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करण्याचे आवाहन.

Bhairav Diwase.    July 27, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर

चंद्रपूर:- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे मार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर खेळाडूंची शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे प्राप्त झाली असून संबंधित खेळाडूंनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपली शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक यांनी केले आहे.

राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने सन 2019-20 या वर्षात भारतीय शालेय खेळ महासंघ दिल्ली, जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट सोसायटी दिल्ली व सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट एज्युकेशन सोसायटी, दिल्ली यांच्याद्वारे राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेतील विविध खेळ प्रकारात 11, 14, 15, 17 व 19 वयोगटातील महाराष्ट्र राज्याचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय खेळाडूनी भाग घेतला होता.

ही आहेत कुस्तीगीरांची नावे:

श्रेया माणचंद नाकतोडे, आर्तीका उपाध्ये, अंजली अमर गोरे, शोएब खलील शेख, समीर ज्ञानेश्वर कड, इत्तेशाम गुलाब शेख, साहिल संजय गौरकार, शैल संतोष घायवट, मिसबा खान पठाण, प्रगती कायरकर, प्रल्वल गौरकार, स्मृती आत्राम, पूर्वा प्रकाश तुमाने, यश विश्वास बलजकी या कुस्तीगिरांनी 3 हजार 750 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने