भाजपा जिल्हाध्यक्ष मा. देवराव भोंगळे यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून नागेश इटेकर यांचे स्वागत केले व पक्षप्रवेशाबाबत शुभेच्छा.
Bhairav Diwase. July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपीपरी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष नागेश ईटेकर यांनी भाजपात प्रवेश घेतला, भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवरावभाऊ भोंगळे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या उपस्थितीत नागेश इटेकर यांनी प्रवेश घेतला, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. देवराव भोंगळे यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून नागेश इटेकर यांचे स्वागत केले व पक्षप्रवेशाबाबत शुभेच्छा दिल्या .
भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांवर प्रभावित होवून तसेच माजी अर्थमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोनामुळे प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून यापुढे, गोंडपीपरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे संघटन अजून अधिक मजबूत करण्यासाठी आपण मेहनत घेऊ असे नागेश इटेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी , माजी आमदार संजयभाऊ धोटे , हरीशभैय्या शर्मा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष , सुदर्शनजी निमकर माजी आमदार, ब्रिजभूषण पाझारे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, बबन निकोडे तालुकाध्यक्ष, निलेशभाऊ संगमवार, साईनाथ मास्टे, दिपक सातपुते, अश्विन कुसनाके, राकेश पून, संजय झाडे, गणपती चौधरी, सुनील फुकट भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.