विजवितरण कंपनीने लवकरात लवकर शेतीला मीटर लावून द्यावे अशी मागणी संबधित शेतकरी करीत आहे.
Bhairav Diwase. July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील लोंढोली येथील संजय घोंगडे यांची शेती वर टेकडी भागावर असल्यामुळे शेतीचे उत्पन्न होत नव्हते. वरच्या पाण्याच्या आधारे शेती करने कठीण होते आणि त्याच्या शेतातून विज खांब शंकर घोंगडे यांच्या शेतात गेले होते म्हणून शेतकार्याने शेतीला मीटर घेऊन मोटरपंपच्या सहाय्याने शेती करावी म्हणून २६ जून २०१८ ला डिमांड भरल्या गेले पण अजूनही मीटर न लागल्यामुळे शेती कशी पिकवावी. या वर्षी पाऊसात भरपूर गॅप पडत असल्यामुळे पर्हे कसे जगवावे आणि रोवना कसा करावे हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. तरी विजवितरण कंपनीने लवकरात लवकर शेतीला मीटर लावून द्यावे अशी मागणी संबधित शेतकरी करीत आहे.
'शेतीच्या मीटरला सिनाईरिटी लागत असते. तिन वर्षापासून काही मीटर अजूनही लावणे चालूच आहे आणि मार्च २०१८ पर्यंत मीटर लावून झालेले आहेत तर पुढच्या भागात एप्रिल २०१८पासूनचे मीटर लावण्यात येईल'- गौरकार उपविभागीय अभियंता व्याहाड खुर्द