कवठी येथिल शेतकरी कमलाकर बटे यांची बैलजोडी 30 जून रोजी वीज पडल्याने ठार झाली होती.
Bhairav Diwase. July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली :- कवठी येथे नैसर्गिक वीज पडल्याने कमलाकर बटे या शेतकऱ्यांचे दोन्ही बैल ठार झाले. शेतकऱ्यास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते शासकीय मदत देण्यात आली.
कवठी येथिल शेतकरी कमलाकर बटे यांची बैलजोडी 30 जून रोजी वीज पडल्याने ठार झाली होती. याबाबत तातडीने सभापती विजय कोरेवार यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव सादर केला. ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी अडचणीत सापडला होता. यावेळी नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी केली होती. तात्काळ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दखल घेत तात्काळ शासकीय मदत देण्याचे निर्देश दिले. आज नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून 50 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते कमलाकर बटे यांना तहसिल कार्यालयात वाटप करण्यात आला.