भाजपकडून शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध.
गोंडपिपरीतुन जाणार २००० पत्रे.
Bhairav Diwase. July 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही,असे जाहिर वक्तव्य शरद पवार यांनी नुकतेच केले.यावरून राजकिय वर्तुळात चांगलेच रान पेटले आहे.भाजपने शरद पवारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
कोरोना आणि राम मंदिराचा कुठलाच संबंध नाही. असे असतांना शरद पवार राम भक्तांच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करित आहेत.यामुळे भाजपने शरद पवारांना प्रभू श्रीरामाच्या नावाची आठवण करून देण्यासाठी म्हणून "जय श्रीराम" लिहिलेले पत्र त्यांच्या पत्यावर पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेत आता राज्यभरातून शरद पवारांच्या पत्यावर "जय श्रीराम" असे लिहिलेल्या पत्रांचा भडिमार केला जाणार आहे.गोंडपिपरी शहरातून देखिल या मोहिमेत पत्रे पाठवली जात आहेत.सुमारे २००० पत्रे यावेळी पाठवली जाणार आहेत.पवारांच्या सिल्वर ओक,मुंबई येथे पाठवली जाणार आहेत.आमदार सुधीर मुनगंटीवार नेतृत्वाखाली आतापर्यंत १००० पत्र पाठविण्यात आली आहेत.यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष बबन निकोडे,भाजपा नेते निलेश संगमवार,साईनाथ मास्टे,युवा मोर्चा जिल्हा सचिव राकेश पून,संजय झाडे,नाना येल्लेवार,गणपत चौधरी,सुनील फुकट,नागेश इथेकर आदींचे प्रयत्न राहिले आहेत.