टाळेबंदीत आलेल्या अवाढव्य वीज बिलाविरोधात मुल भाजपाचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन.

Bhairav Diwase
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा मुल भाजपच्या तालुकाध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मुल तालुका यांच्यावतीने मा. नायब तहसीलदार श्री. साधनवार साहेब यांना निवेदन.
Bhairav Diwase.    July 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- कोरोणा सारख्या जागतिक महामारीच्या संकटात संपूर्ण देशभर टाळेबंदी घोषित करण्यात आलेली आहे. यात मागिल काही महिन्यांपासून संपूर्ण व्यवहार ठप्प असतांनाही वीज वितरण कंपनीने ग्राहकांकडे अवाढव्य वीज बिलाची मागणी केली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी आणि महाविकासआघाडी सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांमुळे जनतेत सर्वत्र चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे आलेले वीज बिल संपूर्णतः माफ करण्यात यावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा मुल भाजपच्या तालुकाध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मुल तालुका यांच्यावतीने मा. नायब तहसीलदार श्री. साधनवार साहेब यांना निवेदन देण्यात आले. 

 महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आपले क्षोभ व्यक्त करतांना, जून महिन्यात आलेले टाळेबंदी काळातील मार्च ते जून महिन्याचे वीज बील सरासरीपेक्षा जास्त दराने देऊन सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम वीज वितरण कंपनीद्वारे केले जात आहे. टाळेबंदीच्या काळात सर्वांच्या हातचे रोजगार बुडाल्याने सर्वसामान्य माणसासमोर जगण्या-मरण्याचा संघर्ष उभा ठाकला होता. याची जाणीव असून सुद्धा राज्य सरकार आणि सरकार संचालित महावितरण कंपनीने विजबीलाचे अंकेक्षण दर महिन्याचे वेगवेगळे केले नाही, तसेच वेगवेगळे बीलही दिले नाही. आणि आता तीन महिन्यानंतर सरसकट ढोबळ मानाने वाढीव व जास्त दराप्रमाणे बिल देवून सर्वसामान्यांवर अन्याय केला आहे. नागरिकांना होणार त्रास व दयनीय आर्थिक कोंडीला टाळण्यासाठी प्राप्त तीन महिन्यांचे वीज बील संपूर्णतः माफ करण्यात यावे. आणि सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबवावी. अन्यथा वीज वितरण कंपन्यांसहीत महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 
यावेळी, भाजपाच्या मुल तालुकाध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, पं. स. सभापती चंदू मारगोणवार, उपसभापती घनश्यामजी जुमनाके, माजी सभापती तथा पं. स. सदस्या पुजा डोहणे, वर्षा लोनबले, सरचिटणीस अमोल चुदरी, आनंद पा. ठिकरे, अमोल येलंकिवार, सुभाष सुंभ, वंदना आगरकाटे, मुकेश गेडाम, राजु पोटे, मनोज बोरूले, विजय पाकमोडे, ताराबाई चांभारे, चंदू नामपल्लीवार, देवीदासजी पिट्टलवार, उत्तम लेनगुरे, गनेश चौधरी, गुलशन लाकडे, सचिन गुरनुले, शुभम समर्थ यांसह आदी मंडळी उपस्थित होते.