कोरोना मध्ये पेपर घेतल्यास विद्यार्थ्यांनाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता.
Bhairav Diwase. July 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- आज दि. 22/7/2020 ला फार्मसी कृती समिती जिल्हा चंद्रपुर च्या वतीने कोरोना काळात यु.जी.सी च्या गाईडलाईन अंतर्गत केंद्र सरकारने विद्यापीठाना फायनल इयर चे पेपर घेण्याचे आदेश दिले आहेत परंतु या कोरोना मध्ये पेपर घेतल्यास विद्यार्थ्यांनाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्या या निर्णयावर फेरविचार करावा या साठी फार्मसी कृती समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष अंकुश कोल्हे, जिल्हासचिव सागर मंडल व नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते सुरज मारोती गव्हाने, आकाश नळे, उत्पल गोरे यांनी मा.आमदार सुभाष भाऊ धोटे साहेब राजुरा विधानसभा यांना निवेदन देण्यात आले.