Top News

भिसी ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच व विस्तार अधिकारी ए. सी.बी.च्या जाळ्यात.

तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना केली रंगेहात अटक.
Bhairav Diwase. July 22, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत येथील सरपंच सौ.गोहणे व उपसरपंच श्री.बन्सोड तसेच चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री हुंमणे यांना आज तीस हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केली आहे.

भिसी ग्राम पंचायत चे सचिव येवले यांची भिसी येथील काही स्थानिक लोकांनी तक्रार केली होती त्या समबंधीत प्रकरणांची चौकशी विस्तार अधिकारी हुंमणे यांचेकडे होती वारंवार पैशांची मागणी केल्याने सचिव येवले यांनी सरपंच, उपसरपंच व विस्तार अधिकारी यांचे विरोधात लाच लुचपत विभागाला तक्रार केली आज या विभागाने सरपंच उपसरपंच व विस्तार अधिकारी यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने