खासदार अशोकजी नेते व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची मुरपार कोळसा खाणला भेट.

Bhairav Diwase
बंदर कोळसा खाण व सी एस,आर फंडामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा घेतला आढावा.
Bhairav Diwase.    July 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील मुरपार कोळसा खदानला चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी भेट दिली भेटी दरम्यान खदान कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.मुरपार येथे बंदर कोळसा खाण संदर्भात आढावा घेण्यात आला असून काही लोकं ह्या खाणी बद्धल विरोध दर्शवित आहेत मात्र हे नागरिक स्थानिक नसून बाहेरचे असल्याचे निदर्शनात येत असल्याचे आमदार बंटीभाऊ यांनी लक्षात आणून दिले बंदर कोळसा खाण सुरू झाल्याने फार मोठा फायदा होईल इथल्या लोकांना रोजगार मीडेल त्यामुळे या खदाणला विरोध करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया खासदार नेते यांनी व्यक्त केली.

   मुरपार कोळसा खदानला अंतर्गत येत असलेल्या गावात  खदाणच्या सी.एस.आर.फंडामार्फत करण्यात येणाऱ्या व नियोजीत असणाऱ्या कामांवर चर्चा करण्यात आली व अंर्गत येणाऱ्या गावांत सर्वे करून लोकांच्या गरजेनुसार नियोजीत कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिल्या.त्याचप्रमाणे खदाणनमध्ये स्थानिक कामगार कमी असल्याने नवीन स्थानीक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील दिल्या.

  यावेळी खासदार अशोकजी नेते ,आमदार बंटीभाऊ भांगडीया जी.प उपाध्यक्षा सौ रेखाताई कारेकर डॉ.श्यामजी हटवादे ,वसंतभाऊ वारजूकर,उपविभागीय अधिकारी चिमूर श्री संपकाळ साहेब,चिमूर ठाणेदार श्री स्वप्निल धुळे,प्रकाश वाकडे ,बकारामजी मालोदे राजू देवतळे  दिलीपजी कारेकर यांची उपस्थिती होती.