चंद्रपुरात सुरु असलेल्या सर्व पुलांचे काम जलद गतीन करा. आमदार जोरगेवार यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना.

Bhairav Diwase
अधिका-यांशी बैठक, वरोरा नाका, दाताळा पुलाची पाहणी
Bhairav Diwase.    July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात पाच उड्डान पुलाचे काम सुरु आहे. मात्र या कामात होत असलेल्या दिरंगाईमूळे नागरिकांची गैरसोय वाढतांना दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार विकासकामांना चालना देण्यासाठी प्रयत्नशिल असून या कामात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी कटिबंध्द आहे. त्यामूळे या पुलांच्या निर्मीती कामात येणा-या अडचणी तात्काळ सोडवून पाचही पुलांचे काम जलद गतीने करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्यात.