"डॉक्टर डे ” च्या निमित्याने काल शहरातील डॉक्टरांचा यंग चांदा ब्रिगेड तर्फे सत्कार.

Bhairav Diwase
रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा:- यंग चांदा ब्रिगेड
Bhairav Diwase.    July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- “डॉक्टर डे”  च्या निमित्याने काल चंद्रपूर शहरातील विविध डॉक्टरांचे यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, रुपेश कुंदोजवार, सुबस्टन जॉन, स्नेहदीप जोब, नकुल वासमवार, रुपेश पांडेय, गौरव जोरगेवार यांची यावेळी उपस्थिति होती.

           ३६५ दिवस २४ तास सदैव कार्यरत क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र आहे. औद्योगिक दृष्ट्या संपन्न अशा चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय सेवेत डॉक्टर आपले कार्य करीत आहे. कोरोणा ( कोविड - १९ ) विषाणुचे प्रादुर्भाव जगासह देशावर आले असून आलेल्या भयंकर संकटावर मात करत डॉक्टर रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून कार्य करत आहेत. त्याबद्दल काल यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.