Top News

माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनानिमित्त जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून प्रा. आ. केंद्र व्याहाड (बुज) येथिल आशा वर्कर्सना अन्नधान्याच्या कीटचे वितरण.

सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड (बुज) येथे सेवा देत असणार्‍या आशा वर्कर यांना अन्नधान्याच्या कीटचे वितरण. 
Bhairav Diwase.    July 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी कोरोणा महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत असतांना योद्धे बनून राष्ट्रीय सेवा बजावणार्‍या आशा वर्कर्संचा सन्मान करत, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड (बुज) येथे सेवा देत असणार्‍या आशा वर्कर यांना अन्नधान्याच्या कीटचे वितरण केले.

यावेळी मार्गदर्शनात्मक बोलतांना, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाधितांची नोंद होत आहे. अश्या परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारीच्या दृष्टीने रात्रंदिवस सेवा देऊन अपुऱ्या मानधनातही राष्ट्रीय सेवा देण्याचे काम तुम्ही आशा भगिनींनी केले आहे. याचे आम्हाला अभिमान आहे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांसमवेत, पं. स. उपसभापती रविन्द्र बोल्लीवार, पं. स. संवर्ग विकास अधिकारी भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. खेमराज मडावी, डॉ. मस्के, दिवाकर मॅकलवार, अशोक ठाकरे, धनराज गुरनुले, नामदेव भोयर यांसह आशा भगिनी तथा प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने