जिल्हा भाजपाने केलेल्या आवाहनानुसार आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनात नागभीड येथील टी पाॅईंट जवळील वीज वितरण कंपनीच्या सहा.अभियंताच्या कार्यालयासमोर भाजपाचे आंदोलन.
Bhairav Diwase. July 17, 2020
नागभीड:- जिल्हा भाजपाने केलेल्या आवाहनानुसार आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनात नागभीड येथील टी पाॅईंट जवळील वीज वितरण कंपनीच्या सहा.अभियंताच्या कार्यालयासमोर भाजपाचे जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे तथा तालुका अध्यक्ष व पं.स.सदस्य संतोष रडके यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शन करुन भरमसाठ आकारणी करण्यात आलेल्या वीज बिलांची होळी करण्यात आली.
यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तालुका भाजपाच्या वतीने नागभीडच्या नायब तहसिलदार वक्ते मॅडम यांना देण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान.ऊध्दवजी ठाकरे यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात लाॅकडाऊन काळातील वाढीव वीज बील माफ करा, रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना निधी वितरण त्वरीत करावे , शेतकऱ्यांना युरीया खताचा सुरळीत पुरवठा करावा , बारा बलुतेदार व गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकारने पॅकेजची घोषणा करावी , भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील “ राजगृह “ निवासस्थानावरील भ्याड हल्ल्यातील समाजकंटकांवर त्वरीत कारवाई करावी , यांसह इतरही मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे , भाजपा तालुका अध्यक्ष संतोष रडके यांच्यासह नागभीड न.प.चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृऊबास सभापती अवेश पठाण , न.प.सभापती सचिन आकुलवार व दशरथ ऊके, नगरसेवक रुपेश गायकवाड व शिरिष वानखेडे , कृऊबास संचालक आनंद कोरे , बंडुभाऊ क्षिरसागर , प्रदिप धकाते , आनंद भरडकर , बालु मेश्राम ई. कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
नागभीड तालुक्यात आज तळोधी , गिरगाव , वाढोणा , बोंड , मिंडाळा, पाहार्णी, मौशी, कान्पा यांसह ४० गावात वीज बिलांची होळी करुन राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.