63 पैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात गडचांदूर येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालय मार्च 2020 च्या अंतिम परीक्षेत विद्यालयाने घवघवीत यश मिळविले नेहमी प्रथम क्रमांकावर असणाऱ्या महात्मा गांधी विद्यालयाचा दुसरा क्रमांक आला लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा वर्ग 10 वी मार्च 2020 चा निकाल 95.23% 63 पैकी एकूण 60 विद्यार्थी पास.
तसेच महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर. 95.17%, सावित्री बाई फुले विद्यालय, 90.32%. व स्व भाऊराव पाटील चटप माध्यमिक आश्रमशाळा, गडचांदूर 89.74% लागला असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन येथील शिक्षकानी केले.