Top News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मा. हंसराज जी अहीर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची भेट.

महानगर पालिका प्रशासनाने परिश्रमपूर्वक स्थिती हाताळून हे सुयश प्राप्त.
Bhairav Diwase.    July 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मा. हंसराज जी अहीर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची भेट देऊन कोरोना नियंत्रणाबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चंदपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला यश प्राप्त झाले आणि जिल्ह्यात एकही रुग्ण दगावला नाही याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे  आणि महानगर पालिका प्रशासनाने परिश्रमपूर्वक स्थिती हाताळून हे सुयश प्राप्त केले आहे याबद्दल या सर्वांचे अभिनंदन केले. तसेच यांच्या समवेत स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या चर्चेत क्वारंटाईन केलेल्यांना स्वतंत्र शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे सोबतच अनेक सूचना केल्या. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने