चेक आष्टा येथील युवक रानडुकराच्या धडकेत जखमी.

Bhairav Diwase
युवकांचे नाव शामसुंदर राजेश्वर कुसराम (वय अंदाजे ३१) रा. चेक आष्टा
Bhairav Diwase. July 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चेक आष्टा येथील युवक श्री. शामसुंदर राजेश्वर कुसराम (वय अंदाजे ३१) हे रोजच पोंभुर्णा तालुक्यात सकाळी ६:०० वाजता आपल्या गाडीने दुध विकायला जातात. आज सकाळी गाडीने दुध विकायला नेत असताना पोंभुर्णा-आक्सापुर मार्गावर (माऊली) येथे एका रानडुकराने गाडीला धडक दिली. त्या धडकेत सदर व्यक्ती खाली पडला. त्यामध्ये तो व्यक्ती जखमी झाला. ही बातमी परिसरात पसरता.

     त्यावेळी पोंभुर्णा येथील २ युवक धावासाठी आले असता. सदर व्यक्ती खाली पडला दिसला. त्याला उचलून बाजूला बसवले. नंतर गाडी उचलून ठेवली. जखमी व्यक्ती कसा बसा गाडी चालवत घरी पोहचला. सदर घटनेची माहिती मिळताच गारडाने सदर व्यक्तीच्या घरी येऊन बयना लिहून घेतला. पंचनामा करुन जखमी व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.